भ्रष्ट कारभार आणि भ्रष्ट व्यवस्थेविरूध्द लढणारी पिढी तयार करायची - राजेंद्र गांधी
अहमदनगर - राज्यभर गाजत असलेल्या अर्बन बँक बचाव समितीचे शिलेदार राजेंद्र गांधी
यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.१६ रोजी कामगार संघटना महासंघ आणि ऑल
इंडिया युथ फेडरेशन यांच्यावतीने केडगाव स्थित 'सावली' संस्थेतील मुलांसाठी
५,४००/- रूपये रकमेची विविध प्रकारची पुस्तके भेंट दिली. एसटी स्टँड
शेजारील महावीर कलादालन येथील 'साहित्यनगरी ग्रंथ प्रदर्शन' येथुन घेतलेली
हि ग्रंथसंपदा आहे. यामधे बालसाहित्य, चरित्रग्रंथ असे विविध साहित्य आहे.
वेळी नितेश बनसोडे, बापुसाहेब गोरे, मनोज गुंदेचा, कॉ.प्रा.डॉ.महेबुब
सय्यद, रामदास वागस्कर, समृध्दी वाकळे, फिरोज शेख, भैरवनाथ वाकळे व
'सावली'तील सर्व बाळगोपाळ उपस्थित होते. यावेळी
बोलताना राजेंद्र गांधी म्हणाले कि, भ्रष्ट कारभार आणि भ्रष्ट
व्यवस्थेविरूध्द लढणारी पिढी आपल्याला तयार करायची आहे. आम्हाला
स्व.सुवालालजी गुंदेचा यांच्यासारखे सहकारातील मोठी माणसे मार्गदर्शक
म्हणून लाभली. त्यांच्यासोबत काम केल्याचा मोठा अनुभव गाठीशी आहे. भ्रष्ट
लोक बँकिंगचे वाटोळे करायला निघालेले होते. त्यांना अभ्यासपुर्ण व धाडसाने
थांबले आहे. यासाठी जीवावर उदार होऊन टिमवर्क करत लढाई लढलो आहोत. आता
याही पुढे भ्रष्ट कारभार आणि भ्रष्ट व्यवस्थेविरूध्द लढणारी पिढी आम्हाला
तयार करायची आहे. त्यासाठी नव्या पिढीने अभ्यास करणे गरजेचे आहे.
यावेळी कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांनी 'ग्रंथांचे आपल्या आयुष्यातील
जडणघडणीतील महत्व' या विषयावर मनोगत व्यक्त केले तसेच मनोज गुंदेचा यांनी
मुलांच्या व संस्थेच्या हितासाठी सदैव सोबत राहु असे आश्वासन दिले. सुत्रसंचालन फिरोज शेख यांनी तर नितेश बनसोडे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत