LOKHEET

Breaking News

फातिमाबी शेख काव्यग्रंथाचा २६ ला प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन

अकोले - फातिमाबी शेख काव्यग्रंथाचा २६ ला प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन आयोजित करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचा   प्रकाशन सोहळा दिनांक २६ सप्टेंबर २०२१रविवारी  रोजी सायंकाळी  चार वाजता पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या  सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ८९व्या अखिल  भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस हे असतील. अशी माहिती संयोजकांनी दिली. 

ग्रामीण मुस्लिम  मराठी  साहित्य संस्था, पुणे जिल्हा शाखा आयोजित, पहिल्या भारतीय शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जीवनचरित्रावर आधारित कवितांचा  प्रातिनिधीक काव्यसंग्रह कवयित्री अनिसा सिकंदर शेख व कवयित्री दिलशाद यासीन सय्यद यांनी  फातिमाबी शेख  या  शिर्षक नावाने संपादित केला आहे.

 या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष  कवीवर्य बा. ह. मगदूम , संस्थापक अध्यक्ष शेख शफी बोल्डेकर, ग्राफीक्सकार रशीद तहसीलदार यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत