नगर मनमाड रोड वरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी
नगर पासून ते राहुरी पर्यंत साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर रोड वर खूप मोठ मोठे, खड्डे पडलेले आहेत. त्यात आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलेला आहे यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वीच याच रोडवरील खड्डे बुजवले गेले होते परंतु अवघ्या दोन ते तीन पावसात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि आता तर हा रस्ता नॅशनल हायवे कडे वर्ग करण्यात आल्यामुळे यानंतर खड्ड्याच्या पॅकिंगचे काम हे अतिशय उत्कृष्ट होईल अशी आशा लागली आहे.
लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या आठ दिवसात खड्डे व्यवस्थित बुजून रोड पूर्ववत करावा अन्यथा राष्ट्रवादी नगर तालुका च्या वतीने एन एच ए आय अहमदनगर मनमाड हायवे यांच्या कार्यालयावर 26 सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत